Type Here to Get Search Results !

कळंब आगारात तब्बल 3तास उलटूनही बस वेळेवर येत नसल्याने प्रवाश्यांचा खोळंबा? प्रशासन दुर्लक्ष का करतय


  1. कळंब (प्रतिनिधी)

साहेब लातूर गाडी कधी येईल लय भूक लागली आहे म्हणून 70 वर्षीय आजोबा गाडीची विचारपूस करतात आणि गाडी मात्र वेळेवर लागत नसल्याने आजोबा थकून बसले पण 3 तास झाले तरी सुद्धा बस येईना असा कारभार कळंब आगारचा झाला आहे.कळंब आगारात तब्बल 3तास उलटूनही बस वेळेवर येत नसल्याने प्रवाश्यांचा खोळंबा होत असून याकडे कळंब आगाराचे व्यवस्थापन अधिकारी याकडे लक्ष देण्यास तयार नाहीत.

कळंब लातूर जाणाऱ्या गाड्यांच्या संख्या जास्त आहेत.मात्र दुपारी 4 30 वाजेपर्यंत लातूर ला जाणारी गाडी लागत नसल्याने तब्बल  3 तास प्रवाशी बसची वाट बघत होते.कळंब आगारात आगारप्रमुख नसल्याने त्यांच्या जागी कामे पाहणारे अधिकारी हे याना प्रवाशांचे देने घेणे नसल्यासारखे वागत आहे याकडे जिल्हा प्रशासन देखील लक्ष देण्यास तयार नाहीत तर लातूर ला बस का उशीर झाला हे सांगण्यासाठी अधिकारी उपलब्ध दिसत नाहीत.जाणूनबुजून येथील अधिकारी दुर्लक्ष करतात का असा प्रश्न निर्माण झाला आहे.प्रवाशांनी विनवणी करून सुद्धा लातूर गाडी 7 वाजून 19 मी काढण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments