कळंब (प्रतिनिधी)
वाळूची वाहतूक सुरुळीत करुन देण्यासाठी आठ हजार रुपयांची लाच घेताना कळंब येथील तहसीलदार यांच्या ड्राइव्हरला लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले असुन गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे. तहसीलदार यांचा ड्राइव्हर पकडल्याने मोठी खळबळ उडाली असुन कोणाच्या सांगण्यावरुन या ड्राइव्हर पैशे घेतले याचा तपास लागणार का?
तक्रारदार हे ट्रॅक्टरने वाळु वाहतुक करतात यातील आरोपी लोकसेवक अनिल सुरवसे हे कळंब तहसिलदार यांचे वाहनावर वाहन चालक असुन त्याने तक्रारदार यांना वाळु वाहतुक करुन देण्यासाठी व वाळुचे ट्रॅक्टरवर कोणतीही कारवाई न करण्यासाठी 19 डिसेंबर रोजी पंचांसमक्ष तक्रारदार यांच्याकडे महिन्याला हप्ता म्हणुन 15 हजार रुपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती 8 हजार रुपये लाच रक्कमेची मागणी केली व लाच रक्कम तक्रारदार यांचेकडुन पंचांसमक्ष स्विकारल्याने त्यास ताब्यात घेतले असुन पोलीस स्टेशन कळंब येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालु आहे.
लाचेची मागणी करून तडजोडीअंती 8 हजार रुपये रक्कमेची मागणी केली व लाच रक्कम तक्रारदार यांचेकडुन पंचांसमक्ष स्विकारल्याने त्यास ताब्यात घेतले असुन पोलीस स्टेशन कळंब येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालु आहे.
या कार्यवाहीत पोलिस अधीक्षक संदीप आटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी म्हणून पोलिस उपअधीक्षक सिद्धाराम म्हेत्रे यांनी कारवाई केली. सापळा पथकात पोलीस अंमलदार दिनकर उगलमुगले, सचिन शेवाळे, नागेश शेरकर, चालक दत्तात्रय करडे याचा समावेश होता.

Post a Comment
0 Comments