Type Here to Get Search Results !

कळंब येथील साईराम मल्टीस्टेट बंद ?..ठेवीदारांच्या पैशाचं काय?....


 कळंब न्युज (प्रतिनिधी)

एक एक रुपया जमा करुन नागरिकांनी मल्टिस्टेट बँकेत जमा केले पण गेल्या दोन दिवसापासून बँक बंद असल्याने ठेवीदारासह सोने तारण करणारे नागरिक परेशान झाले आहेत.

कळंब येथील साईराम अर्बन मल्टिस्टेट  को ऑप क्रे सो लि बीड ही खाजगी संस्था शहरात गेल्या अनेक वर्षांपासून सुरु होती मात्र गेल्या दोन ते चार दिवसांपासून ही मल्टिस्टेट बंद असल्याने ठेवीदार, सोने गहानदार, पिग्मी भरणारे छोटे व्यापारी यांचे मोठे नुकसान होण्याचे चिन्ह दिसत असल्याने या ग्राहकांना मल्टिस्टेट पैसे वापस देणार का नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे.

कळंब शहरातील नागरिकांनी मोठा विश्वास ठेऊन या मल्टीस्टेट मध्ये पैशाची गुंतवणूक केली होती.अचानक हि मल्टीस्टेट बंद झाल्याने ठेवीदार व अन्य गुंतवुणूकदार यांच्या पैशाची जवाबदारी घेण्यासाठी या संस्थेचे चेअरमन , बँकेतील कर्मचारी सर्व जण गायब झाले असल्याने मोठा तेढ निर्माण झाला आहे.

बँकेतील कांही कर्मचारी मोजक्या लोकांचे फोन उचलतात आणि बँकेची १ २ कोटीची मालमत्ता विक्री झाली असून लवकरच पैसे मिळतील अशे खोटे आश्वासन देत आहेत.शाखेतील कर्मचारी कुणाच्याही संपर्कात नसल्याने ठेवीदारांच्या ठेवीचे काय होणार हा मोठा प्रश्न निर्माण आहे. 

Post a Comment

0 Comments