कळंब न्यूज ( प्रतिनिधी )
तालुक्यातील डिकसळ येथे रोजगार हमी योजनेअंतर्गत निकृष्ठ दर्जाचे काम होत असल्याची तक्रार तहसीलदार यांच्याकडे देण्यात आली आहे.
कळंब तालुक्यात सध्या ९५/५ म्हणजे रोजगार हमी योजना अंतर्गत भरपूर कामे सुरु असून तालुक्यातील डिकसळ गावातील विठ्ठल रुक्मिणी मंदिर ते नरसिंग सर्जेराव मगर यांच्या घरापर्यंत सदरील काम चालू असून सदरील रोजगार हमी योजना चे काम पूर्ण पणे बोगस आहे.सदरील कामाचे मस्टर थांबवण्यात यावे, काम अंदाजपत्रक प्रमाणे होत नसले बाबत या तक्रारीत म्हटले आहे.रोजगार हमी योजनेतील काम हे मजूर लावून करून घ्यावे लागते मात्र हे काम मजुराने न करता यंत्रणेद्वारे चालू आहे. सदरील काम बोगस असल्याची तक्रार चक्क डिकसळ ग्रामपंचायत सदस्यांचे पती संजय त्रिंबक अंबिरकर यांनी कळंब तहसीलदार यांच्याकडे केली आहे.


Post a Comment
0 Comments