कळंब न्यूज ( प्रतिनिधी )
धाराशिव कळंब मतदार संघात महायतीकडून उमेदवार घोषित करण्यात आला आहे.गेल्या अनेक दिवसापासून या मतदार संघात महायुती कोणाला उमेदवारी देणार याकडे लक्ष लागले होते मात्र आता हा तिढा संपला असून कळंब भाजपचे तालुकाध्यक्ष यांना शिवसेनेत प्रवेश देऊन उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
शिवसेना ( शिंदे गट ) कडून आज यादी जाहीर करण्यात आली असून भाजपचे तालुकाध्यक्ष यांचा शिवसेनेत प्रवेश देऊन उमेदवारी देण्यात आली असून अनेक इच्छूकांचा हिरमोड झाला आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून कळंब तालुक्यातून उमेदवारी मिळत नव्हती.यावेळी कळंबकरानी स्थानिकचा आमदार करण्याचा निर्धार केला.यातच आता अजित पिंगळे यांना उमेदवारी जाहीर झाली असून कळंबला उमेदवारी देण्यात आल्याने या उमेदवारीचे फटाक्यांची आतिषबाजी करुन स्वागत करण्यात आले आहे.
या मतदार संघात अनेक दिग्गज उमेदवारीसाठी मुंबई येथे तळ ठोकून होते मात्र यातच आता पिंगळे यांनी बाजी मारली आहे.
Post a Comment
0 Comments