कळंब ( प्रतिनिधी )
धनगर समाज आरक्षणामुळे माझ्यावर यापूर्वी अनेक वेळा हल्ले झाले असून यापुढे हि हल्ले होतील पण धनगर समाजाला आरक्षण मिळाल्या शिवाय मी स्वस्त बसणार नाही असा इशारा विधानपरिषदेचे
आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिला आहे.
कळंब येथील साई मंगल कार्यालय येथील आयोजित धनगर आरक्षण जागर यात्रा या कार्यक्रमात ते बोलत होते.
पुढे बोलताना पडळकर म्हणाले कि, महाराष्ट्रातील धनगर समाजात जागृती व्हावी ,एकजूट व्हावी, सर्व समाज संघटित व्हावा आणि महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून एस टी धनगर समाजाच्या आरक्षणाची अंबलबजावणी व्हावी म्हणून धनगर आरक्षण जागर यात्रेचे आयोजन केले आहे.धनगर समाजाच्या आरक्षणाची याचीका मुंबई उच्च न्यायालयात दाखल असून याचा निकाल लवकर लागेल जर निकाल समाजाच्या बाजूने नसेल तर प्लान बी तयार असून रस्त्यावर कसे उतरायचे हे समाज बांधवाना सांगण्याची गरज नाही.महाराष्ट्र सरकारची भूमिका सकारात्मक असून धनगर समाजाच्या बाजूने सरकारने लेखी उत्तर न्यायालयात सादर केले आहे. धनगर समाज व इतर समाजाचे आरक्षण मिळू न देण्यासाठी शरद पवार हे सतत अडचणी निर्माण करत आसल्याची टीका यावेळी पडळकर यांनी केली. या कार्यक्रमाचे आयोजन शिवदास बिडगर ,राजाभाऊ सोनटक्के ,खंडेराव
मैंदाड,अशोक शिंपले, सचिन शेंडगे ,भास्कर तारेकर,गावडे साहेब, यांच्या सह कळंब तालुक्यातील धनगर बांधव उपस्थित होते .या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष कस्पटे यांनी केले तर आभार प्रदर्शन शिवाजी शेंडगे यांनी केले.

Post a Comment
0 Comments