Type Here to Get Search Results !

या गावामध्ये सध्याचे व माजी खासदार आमदार यांना गावामध्ये प्रवेश बंदी....

 कळंब ( प्रतिनिधी )

तालुक्यातील तांदुळवाडी या गावातील ग्रामस्थांनी मराठा समाजाला  जो पर्यंत आरक्षण मिळत नाही तो पर्यंत सध्याचे व माजी खासदार आमदार यांना गावामध्ये प्रवेश बंदी करण्याचा ठराव ग्रामपंचायत ने घेतला आहे.

सध्या राज्यभर मराठा समाज आरक्षणासाठी आग्रही झाला आहे.अनेक ठिकाणी वेगवेगळी आंदोलने,साखळी उपोषण चालूच आहेत.  कळंब तालुक्यातील तांदुळवाडी या गावामध्ये सध्याचे खासदार आमदार व माजी खासदार आमदार यांना गावात प्रवेश बंदी करण्यात आली असून ते ह्या पक्षाकडून निवडणूक लढवतील त्या पक्षाला मतदान न करण्याचा ठराव  मंजूर  करण्यात आला आहे.


Post a Comment

0 Comments