Type Here to Get Search Results !

शहरातील आण्णा साठे चौकातील सुशोभीकरण करण्याची मागणी

 

कळंब (प्रतिनिधी)

 कळंब येथील जगविख्यात साहित्यसम्राट डॉ. अण्णा भाऊ साठ चौकाचे सुशोभीकरण करण्याची मागणी आण्णा भाऊ साठे चौक सुशोभीकरण समिती यांनी आमदार कैलास घाडगे पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

या निवेदनात असे म्हटले आहे की, की जगविख्यात साहित्य सम्राट डॉक्टर अण्णाभाऊ साठे हे जागतिक कीर्तीचे साहित्यिक असून भारत देशातील कामगार शोषित पीडित वंचिताचा आवाज आपल्या साहित्य आणि कलेच्या माध्यमातून या व्यवस्थेसमोर मांडणारे महानायक असून सातासमुद्रापलीकडे रशियाची राजधानी मॉस्को येथे भारताचे भूषण छत्रपती शिवाजी महाराजांची महानता ज्यांनी छाती ठोकपणे सांगितली असे महान निर्माते साहित्यसम्राट डॉक्टर अण्णाभाऊ साठे आहेत. जग बदल घालुनी घाव सांगून गेले मला भीमराव या शब्दांमध्ये डॉक्टर भीमराव आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण च्या कार्यक्रमा मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा समतेचा रथ पुढे नेण्याच काम डॉ. अण्णाभाऊ साठेनी हयात भर केले आहे.

कळंब शह


रातील ढोकी रोड वर गेल्या अनेक वर्षांपासून अण्णा भाऊ साठेंच्या नावाने चौकाची स्थापना करण्यात आली आहे मात्र  गेल्या अनेक वर्षांपासून सदर चौकाकडे  दुर्लक्ष होताना दिसत असल्यामुळे समाजामध्ये प्रचंड नाराजी होत आहे. आत्ता पर्यंत झालेल्या सर्व लोकप्रतिनिधी पेक्षा जनतेचे आवडते आणि लोकांमध्ये रमणारे आणि सामान्यांचे प्रश्न सोडवणारे एकनिष्ठ आमदार म्हणून संबंध राज्य भर प्रसिद्ध आहात त्यामुळे  या मागणीची तात्काळ पूर्तता करावी असे या निवेदनात म्हटले आहे.

या निवेदनावर साहित्यरत्न डॉ. आण्णाभाऊ चौक सुशोभिकरण समितीचे अध्यक्ष रोहित संजय कसबे, उपाध्यक्ष अविनाश वैरागे,सचिव धनंजय ताटे, उमेश देडे, अमोल कुचेकर,सचिन कुचेकर,करणं कांबळे,प्रशांत भंडारे,साई कांबळे,अजय ताटे,आप्पा कांबळे,किरण आगाडे,रोहन कसबे,मंगेश कुचेकर, कुणाल कुचेकर,सूरज गाडे,सिद्धेश्वर खैरमोडे,दत्ता झोबांडे,अभिजित शिंदे, बाबा शेळके, दत्ता कुचेकर सनी कांबळे,आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Post a Comment

0 Comments