Type Here to Get Search Results !

मुंबई येथे काँग्रेस ओबीसी विभागाची आढावा बैठक संपन्न.


कळंब न्यूज (राजकीय प्रतिनिधी )

महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेस कमेटी अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या अध्यक्षतेखाली  टिळक भवन मुंबई येथे काँग्रेस ओबीसीं विभागाची चार तास आढावा बैठक संपन्न झाली आहे.

    टिळक भवन मुबंई येथे आयोजित  महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेस कमिटी ओबीसी विभाग चे आढावा बैठकीत महाराष्ट्र राज्यातील सध्याची राजकीय स्थिती आणि एस सि एस टी ओबीसीं व्ही जेएनटि अल्पसंख्याक समाज सातत्याने काँग्रेस पक्षाच्या बाजूने उभा असल्याचे  नाना पटोले यांनी सांगितले. जातनिहाय जनगणना समाजिक स्थिती जाणून घेणे महत्वाचे असून त्यामुळे मी महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष असताना पाठविला असून आज काँग्रेस पक्षाचे नेते राहूल गांधी यांनी सुद्धा जातनिहाय जनगनना आवश्यक असून ती सरकारने त्वरित करावे अशी मागणी केली आहे. एसी एसटी,ओबीसी, व्हिजेएनटि ,अल्पसंख्याक यांनी एकत्रित तळागाळातील जनतेपर्यंत पोहचून, बांधनी केल्यास कॉग्रेस पक्ष स्वबळावर सत्तेवर येऊन महाराष्ट्र राज्याला गतवैभव प्राप्त होऊन राज्यातील जनतेचे कल्याण होईल.यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ओबीसीं विभाग अध्यक्ष भानुदास माळी यांनी ओबीसी विभागाचे मार्फत ओबीसी जनजागृती यात्रा आयोजित केली असून नाना पटोले यांच्या मार्गदर्शन खाली  ही यात्रा संपूर्ण राज्यात व्यवस्थित पार पाडली जाईल..बैठकित महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ओबीसी विभाग उपाध्यक्ष  तुकाराम माळी म्हणाले की ओबीसी आरक्षण आता पर्यंत वाटचालीत ओबीसीसह इतर  आरक्षण संपविण्याचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रणित भाजपा सरकार नेहमी प्रयत्न करीत असते.संघ आरक्षणाला उघट विरोध करीत नसून छुप्प्या मार्गाने विरोध करण्याची संघाची नेहमी वाटचाल असते. ७ आगस्ट १९९० रोजी व्ही.पी.सिंग सरकारने मंडल आयोग अमलात आणला. असताना संघाचे आडवाणी यांनी रथ यात्रा किढली.ती रथयात्रा बिहार मध्ये लालूप्रसाद यादव यांनी अडविली असता व्हि.पी.सिंग सरकारचा पाठिंबा काढून घेतला. एवढेच नव्हे तर देशाचे पवित्र संविधान संपविण्यासाठी संघ प्रयत्नशील आहे. आयुष्यभर संघाचे प्रचारक म्हणून काम केलेले पंतप्रधान मोदीजी यांचा हेतू संघाचे अजिंडा राबविण्याचा असल्यामुळे ओबीसी सह सर्वच आरक्षण धोक्यात आले आहे. याउलट काँग्रेस नेते रहूल गांधी संघाचे डाव हाणून पाडण्यासाठी प्रयत्नशील असून ओबीसी जातनिहाय जनगणनेच्या बाजूने ठाम आहेत.


   ओबीसी ची लोकसंख्या हा एक प्रमुख अडथळा आहे.सन १९३१ नंतर देशाची जातनिहाय जनगनना झाली नाही.ओबीसी च्या जनरेट्यामुळे डॉ. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना   २०११ साली सामाजिक आर्थिक व जाती  जनगनना नियमित जनगणनेच्या पेक्षा वेगळी जनगणना कोट्यवधी रुपये खर्च करून केली आणि सन २०१४ साली सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने आकडेवारी जाहिर केली नाही. न्यायालयाने वेळोवेळी जातीगत जनगनना करण्यासाठी सांगूनही केंद्र सरकारने जातीगत जनगनना केली नाही.  अनुसुचित जातीसाठी १३ टक्के तर अनुसुचित जमातीतीना ७.५टक्के आरक्षण कायम असल्यामुळे महाराष्ट्र राज्यातील काही जिल्ह्यात अनुसुचित जमातीतीची लोकसंख्या जास्त असल्याने अनुसुचित जाती जमाती चे आरक्षण देऊन उरलेले आरक्षण ओबीसींना दिले गेल्याने ते अतिशय कमी प्रमाणात आरक्षण मिळते.

    काँग्रेस नेते ओबीसी वर्गाच्या बाजूने ठामपणे उभे राहिल्यामुळे ओबीसी प्रवर्गाचे एक एक प्रश्न सुटतील.देशात सध्या ९०% समान नागरिक कायदा आहे.परंतू भाजप सरकार समान नागरी कायद्याचे अदुन मधून तुणतुणे वाजविते. समान नागरी कायदा आणि आरक्षण याचा काही एक संबध नाही. भारतीय राज्यघटनेतील कलम ४४ अर्थात समान नागरी कायद्याची पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे.  २०२४ च्या लोकसभा निवडणुकांपूर्वी संपूर्ण देशात समान नागरी कायदा लागू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काही दिवसांपूर्वीच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी याबाबत संकेत दिले होते. या पार्श्वभूमीवर हा समान नागरी कायदा नेमका आहे तरी काय? हे पाहणं गरजेचं आहे.यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस नंदकुमार कुंभार, प्रदेश उपाध्यक्ष श्री पांडुरंग कुंभार यांनी माराठवड्यातील ओबीसी समाजाची अजची मानसिकता व भीती या बाबत नानाभाऊ यांना अवगत केले ,विजय राऊत,शैलेश राऊत,धनराज राठोड,वसंत मुंडे,राजाभाऊ घुटे,चंद्रकांत हिंगे,प्रविण जांभळे,मंगल भुजबळ,शंभो म्हात्रे, अशोक खलाने,यांनी केलेल्या कार्याचा आढावा सांगितला काँग्रेस चे राष्ट्रीय अध्यक्ष श्री मल्लिकार्जुन खर्गे जी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मीटिंग मध्ये मा.राहुल गांधीजी ने मांडलेल्या जातनिहाय जनगणेच्या प्रस्ताव बद्दल अभिनंदनाचा ठराव ओबीसी विभागाचे  प्रदेश अध्यक्ष श्री भानुदास माळी यांनी मांडला. तसेच ओबीसी विभागातर्फे ओबीसी जनसंवाद यात्रेचा विभागवार दौरा मी करणार आहे याची घोषणा आज केली.या दौऱ्याची तारिख निश्चित करून कळवली जाईल. या वेळी माझ्या समवेत ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष श्री.भानुदास माळी,ओबीसी विभागाचे उपाध्यक्ष जेसाभाई मोटवाणी,ओबीसी विभागाचे सरचिटणीस श्री.धनराज राठोड, प्रदेश उपाध्यक्ष पांडूरंग कुंभार श्री.नंदकुमार कुंभार, श्री.जे पी पाटील,श्री.दिगंबर राऊत,श्री.शैलेश राऊत,श्री.जितेश विसे,ओबीसी विभागाची कोर कमिटी सदस्य व विभागीय अध्यक्ष उपस्थित होते

Post a Comment

0 Comments