Type Here to Get Search Results !

उभ्या बसला ट्रकची धडक ८ जण जखमी

 







कळंब ( प्रतिनिधी )

बस स्थानकावर प्रवाशी सोडण्यासाठी उभी असलेल्या बस ला ट्रकने पाठीमागून धडक दिल्याने ८ प्रवाशी जखमी झाल्याची घटना ढोकी जवळील माळकरंजा या गावामध्ये घडली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, कळंब आगाराची धाराशिव कळंब हि बस  धाराशिव वरून कळंब ला येत असताना ढोकी जवळील माळकरंजा या गावातील बसस्थानकावर सकाळी 11 ते 11 :30  च्या आसपास घडली आहे

 प्रवाशी सोडण्यासाठी उभी असताना पाठीमागून MH 44 U 4939 या क्रमांकाची ट्रक येऊन बस गाडी क्रमांक MH 40 N 9731 ला धडकल्याने बसमधील 5 महिला (अंगणवाडी सेविका ) व 3  पुरुष हे जखमी झाले आहेत.

ट्रकच्या धडकेमुळे बस पुढे ढकली गेल्याने बसच्या चालकाच्या पायातील ब्रेक व क्लस सुटल्याने सदरील बस बंद असलेल्या महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या ग्राहक सेवा केंद्राच्या दुकानावर जाऊन ढकली असून यामध्ये बस व दुकानदार यांचे मोठे नुकसान झाले आहे.  

बस अपघातातील जखमींना ढोकी येथील शासकीय रुग्णालयत दाखल दाखल करण्यात होते मात्र तेथे योग्य उपचाराची सोय सुविधा नसल्याने  पुढील उपचारासाठी धाराशिव येथील जिल्हा रुग्णालयात  दाखल करण्यात आले असून या बस मधील वाहक डी एम काळे यांच्या डाव्या हाताच्या खांद्याला मुक्का मार लागला आहे.तर वाहक आर एस गवळी या बसच्या वाहक होत्या मात्र त्यांना कसलाही प्रकारची इजा झालेली नाही.अशी माहिती कळंब आगाराचे व्यवस्थापक करवंदे यांनी दिली आहे.

Post a Comment

0 Comments