कळंब (प्रतिनिधी)
येथील पत्रकार धनंजय घोगरे यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ला प्रकरणी संबंधित आरोपीवर कठोर कार्यवाही करण्याची मागणी कळंब तालुका पत्रकार संघाच्या वतीनेउपविभागीय अधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे.
पत्रकार धनंजय घोगरे हे दिनांक १७ ऑक्टोबर रोजी हे आपल्या गावाकडून कळंब शहराकडे येत असताना सांयकाळी सात ते साडे सात वाजण्याच्या सुमारास दुचाकीवर असलेल्या धनंजय घोगरे यांना पाठीमागून येऊन धडक देऊन गंभीर जखमी करुन घटना स्थळावरवर गंभीर जखमी असलेल्या पत्रकार धनंजय घोगरे यांना गोविंदपूर ता. कळंब येथील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या मिठू मुंडे व विलास कराड यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली.पत्रकार घोगरे यांच्यावर झालेला प्राणघातक हल्ला दहशत माजवण्याचा एक प्रकार असल्याने आरोपीवर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार कठोर कार्यवाही करण्याची मागणी कळंब तालुका पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आली आहे.
या निवेदनावर पत्रकार बालाजी आडसूळ, शीतलकुमार घोंगडे, उन्मेष पाटील; सतीश टोणगे,मुस्तान मिर्झा ,संदीप कोकाटे,परमेश्वर पालकर,माधवसिंग रजपूत , अमर चोंदे, बालाजी सुरवसे, ओंकार कुलकर्णी,
रसूल तांबोळी,अँड मनोज चोंदे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Post a Comment
0 Comments