कळंब (प्रतिनिधी)
मराठा समाजाचा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला असून कळंब - ढोकी महामार्गावर टायर पेटवून चक्क जाम आंदोलन करण्यात आले आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे हे पुन्हा आमरण उपोषणाला बसले आहेत.सरकार याकडे लक्ष देत नसल्याने मराठा समाज चांगलाच आक्रमक झाला आहे.मनोज जरांगे यांच्या उपोषणाला सकळ मराठा यांच्या वतीने पाठिंबा म्हणून कळंब शहरात मुख्य चौकात चक्क जाम आंदोलन करण्यात आले आहे.कळंब शहरातील येरमाळा रोड,ढोकी रोड व परळी रोड या ठिकाणी चक्क जाम आंदोलन करण्यात आले आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न तात्काळ मार्गी लावण्यात यावा अन्यथा यापेक्षा हि अधिक तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा मराठा समाजाच्या वतीने देण्यात आला आहे.

Post a Comment
0 Comments