Type Here to Get Search Results !

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ या दवाखान्यात उपचार देण्यासाठी डॉक्टरच नाही?


कळंब ( प्रतिनिधी )

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ कळंब शहराजवळील डिकसळ येथे सुरु करण्यात आला आहे मात्र या दवाखान्यात गेल्या पाच ते सहा दिवसापासून डॉक्टरच उपलब्ध नसल्याने रुग्णांना सेवा मिळत नसल्याने सामान्य नागरिकांचे मोठे हाल होत आहेत.कळंब शहर व डिकसळ भागातील नागरिकांना हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ च्या माध्यमातून नागरिकांना उपचाराची सोय व्हावी याकरिता शासनाने हा दवाखाना चालू करण्यात आला आहे

.या दवाखान्यामध्ये उपचार घेण्यासाठी गेलेल्या रुग्णांना उपचार करणारे डॉक्टर गेल्या पाच ते सहा दिवसापासून नसल्याने त्या दवाखान्यातील एकटी नर्स रक्ताची चाचणी व औषध उपचार करत आहेत. या दवाखान्यात डॉक्टर कधी येणार ? का येणार नाहीत हे देखील त्यांना माहित नाही.आरोग्य विभाग प्रशासन कसल्याही प्रकारचे लक्ष देत नाहीत.त्यामुळे सर्व सामान्य नागरीकांसाठी सुरु करण्यात आलेल्या या दवाखान्याचा उपयोग नागरिकांसाठी आहे का नाही हा प्रश्न निर्माण होत आहे.सरकारी हॉस्पिटलमध्ये रुग्णांची प्रचंड गर्दी दिसून येते. अगदी ताप, सर्दी अशा आजारांसाठीही रुग्णांना उपचार आणि वैद्यकीय टेस्ट करण्यासाठी घरापासून दूर हॉस्पिटल गाठावे लागते. यावर उपाय म्हणून दर २५ ते ३० हजार वस्तीनजीक ‘आपला दवाखाना’ असावा हे या मागील उद्देश आहे. ग्रामीण तसेच दुर्गम भागांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना प्रत्येक छोट्या आजारासाठी रुग्णालयात यावं लागतं. यामुळे वैद्यकीय उपचाराला उशीर होतोच शिवाय प्रवासाचा खर्च होतो. या गैरसोयी दूर होईल याकरिता शासनाच्या वतीने या दवाखान्याची सोय करण्यात आली आहे मात्र उपचार देणारे डॉक्टर नसतील तर याचा काहीच उपयोग होणार नाही.त्यामुळे प्रशासनाने तात्काळ याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

याबाबत कळंब धाराशिव चे आमदार कैलास घाडगे पाटील यांच्याशी संपर्क केला असता त्यांचा संपर्क झाला नाही.


प्रतीक्रिया 

डिकसळ येथे सुरु असलेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ मध्ये सदरील डॉक्टर हे राजनामा देऊन गेले असून दुसऱ्या डॉक्टरांची मागणी आम्ही केली आहे.शासन स्तरावरून पद भरल्यानंतर डॉक्टर येतील 

डॉ ए ए घोगरे 

तालुका आरोग्यधिकारी कळंब

Post a Comment

0 Comments