वाशी (प्रतिनिधी)
वाशी तालुक्यातील पिंपळगाव ( को ) येथील उपसरपंच यांच्यासह ६ ग्रामपंचायत सदस्यांनी मराठा समाजाला आरक्षणाच्या समर्थनार्थ सामूही राजनामे ग्रामविकास अधिकारी यांच्याकडे दिले आहेत.
मराठा समाजाला तात्काळ आरक्षण मिळावे या मागणीसाठी संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला असून राज्य सरकार आरक्षणाचा मार्ग मोकळा करत नसल्याने संपूर्ण जिल्ह्यात कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. तर मराठा बांधव हे ज्या पदावर आहेत त्या पदांचा राजनामा देत असल्याचे समोर येत आहे.
पिंपळगाव ( को ) येथील उपसरपंच शकुंतला विजय थोरबोले, बाबासाहेब उद्धव कोठावळे, विद्या बाळासाहेब कुरुंद, रेखा बाळकृष्ण वैद्य, उद्धव उत्तम कोठावळे,सतीश लाड या सहा ग्रामपंचायत सदस्यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे व मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणास पाठिंबा म्हणून सामूहिक राजीनामे दिले आहेत .तसेच २ नोव्हेंबर पर्यंत आरक्षण न मिळाल्यास पिंपळगाव ( को ) येथील ग्रामपंचायत कार्यालयास टाळे ठोकून आंदोलन करण्याचा इशारासुद्धा यावेळी देण्यात आला आहे.

Post a Comment
0 Comments