कळंब ( प्रतिनिधी )
कळंब आगारातील बस फेऱ्या रद्द झाल्यामुळे कळंब आगाराचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून बसच्या दररोज २३८ फेऱ्या होत असतात मात्र मराठा आरक्षणामुळे बंद पुकारण्यात आल्याने कळंब आगारातील एकही बस बाहेर निघाली नसल्याने १० लाख ६३ हजार ५०० पन्नास रु इतके नुकसान झाले आहे तर येथील कर्मचारी यांच्यावर सुद्धा उपासमारीची वेळ आली आहे.दररोज कळंब आगारातील बसच्या २३८ फेऱ्या मारत असून त्या २४ हजार ८४ किमी धावत असतात त्यामुळे या आगाराचे उत्पन्न चांगल्या प्रमाणात आहे.मात्र मराठा समाजाला आरक्षण मिळावे याकरिता गेल्या दोन दिवसापासून बंद पुकारण्यात आला असल्याने या आगारातील बस बंद असल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.तसेच कळंब आगाराची बस क्र एम २० बी एल २०२९ या बसची पुढच्या बाजूची बस येडशी येथे फोडण्यात आल्याने २० हजार रुपयाचे नुकसान झाले आहे.
कळंब आगारातील कर्मचारी सध्या तीन वेळेच्या हाजरी पटावर स्वाक्षरी करून आगारात थांबत आहेत मात्र यांचा पगार शासनाने न दिल्यास यांच्यावर देखील उपासमारीची वेळ येणार आहे.अशी माही कळंब आगाराचे आगारप्रमुख करवंदे यांनी दिली आहे.


Post a Comment
0 Comments