कळंब न्युज (प्रतिनिधी)
ग्रामीण भागातील शेतकरी यांना दुय्यम निबंधक हे ऑफिसच्या बाहेर बसण्यासाठी सांगतात आणि ते स्वतः दोन दोन तास फोन वर बोलत बसतात त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची हैराणी होत चालली आहे. वाशी येथील दुय्यम निबंधक कार्यालयातील अधिकारी फोनवर बोलत असल्याने तेथील कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून याकडे वरिष्ठ अधिकारी यांचे लक्ष आहे का नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे.नागरिक कामासाठी बसून त्रस्त तर अधिकारी फोन वर बोलण्यात व्यस्त ..?
वाशी येथील दुय्यम निबंधक कार्यालयात दुय्यम निबंधक हे शेतकऱ्यांची कामे बाजूला ठेऊन इतर माणसासोबत हसी मजाक करत बसल्याचा प्रकार समोर आला असून यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांचे कामखोळंबली आहेत.
वाशी येथील दुय्यम निबंधक कार्यालयातील ग्रामीण भागातील एक शेतकरी गहाणखत करून घेण्याच्या कामासाठी गेले होते त्यांनी त्यांच्या कामाची सर्व कागदपत्रे तयार केली त्यानंतर दुय्यम निबंधक कार्यालयात त्या अधिकारी यांच्या समोर कागदपत्रे दाखवली पण या अधिकाऱ्याचा फोन चालू असल्याने व इतर माणसासोबत त्यांचा हसी मजाक चालू असल्याने सकाळी ११:०० व गेलेल्या शेतकऱ्याचे दुपारी ०३:०० वा झाले.
शासकीय नियमानुसार सकाळी येण्याचा व घरी जाण्याचा नियम शासकीय अधिकारी नागरिकांना सांगत असतात मात्र इतर वेळी नागरिकांच्या कामाच्या वेळी अधिकारी फोन वर बोलत बसत आहे. दुय्यम निबंधकअधिकारी यांचे दुर्लक्ष आणि स्वतःच्या वेळेनुसार शासकीय काम चालत असल्याचा प्रकार वाशी येथे उघड झाला आहे.वाशी येथील दुय्यम निबंधक कार्यालयात प्रभारी दुय्यम निबंधक म्हणून श्री गडकर हे अधिकारी काम क
रत आहेत.नागरिकांच्या तातडीच्या कामावेळी सर्व्हर डाऊन आहे किंवा बंद आहे असे सांगून कामचुकार पणा करत आहेत.

Post a Comment
0 Comments