Type Here to Get Search Results !

ना मैदान .....ना ....योग्य ..मागर्दर्शन युवक घडणार कसा?


कळंब न्यूज ( प्रतिनिधी )

सध्या ग्रामीण भागातील युवक व शहरी भागातील युवक पोलीस भरती होण्यासाठी पहाटे पासून मोठी कसरत करत असून या युवकांना चांगल्या प्रकारचे सर्व सुविधा असणारे मैदान मिळत नसल्याने त्यांचे स्वप्न भंग होताना दिसत आहे.

कळंब शहरासह तालुकयातील ग्रामीण भागातील युवक पोलीस भरती होण्यासाठी मोठी मेहनत घेत आहेत.त्यांच्या या स्वप्नांना लोकप्रतिनिधींकडून कसल्याही प्रकारची मदत होत नाही.कसरत करण्यासाठी लागणारे साहित्य, त्यांना योग्य असे मैदान मिळत नाही.जिथे मैदान असेल तिथेच एकमेकांना सांगून कसरत करत असल्याचे दिसत आहे.आजचा युवक हा उद्याचे भवितव्य आहे.कळंब शहरात दोन ते तीन प्रकारचे मैदान आहेत मात्र तिथे पोलीस भरती करण्यासाठी प्रामुख्याने लागणारे साहित्य नसल्याने त्यांची मोठी हेळसांड होत आहे.युवकांसोबतच युवती सुद्धा पोलीस भरती होण्यासाठी मोठी मेहनत करत आहेत मात्र त्यांना हि योग्य मार्गदर्शन या आणि  भरती होण्यासाठी लागणारे साहित्य मिळत नाही.सध्या महाराष्ट्रातील राजकारणाची परिस्थिती व अन्य कारणामुळे जे कांही वातावरण निर्माण झाले आहे त्याच्याकडे पाहता असे वाटत आहे कि,युवक व युवतींच्या भविष्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.पोलीस भरतीसाठी मोठी तयारी चालू आहे पण पोलीस भरती कधी निघणार यांच्याकडे युवक व युवती आस लावून वाट बघत आहेत.शहरी भागातील युवक उपलब्ध असणाऱ्या मैदानावर पोलीस भरतीची तयारी करतात मात्र ग्रामीण भागातील युवक हा भर रस्त्यावरती वाहतुकीच्या रहदारीवर पोलीस भरतीची तयारी करत आहेत याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज आहे. 



प्रतिक्रिया 

आम्ही दररोज पहाटे ४:३० वाजे पासून पोलीस भरतीची तयारी करत आहोत.रनींगसाठी चांगले मैदान नसल्याने आमची पोलीस भरतीची पूर्व तयारी व्यवस्थित होत नाही.चांगले मैदान मिळाल्यास आम्हाला चांगली तयारी करता येईल याकडे प्रशासनाने व लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची आम्हा सर्व युवकांची मागणी आहे.

किशोर भवर

(कळंब ) 

Post a Comment

0 Comments