कळंब न्यूज (उपसंपादकीय ) दत्ता शेटे
कळंब येथील आगारात वारंवार प्रवाशांना आगर प्रमुख व येथील बस गाड्याचे नियोजन करणारे अधिकारी हे लक्ष देत नसल्याने वारंवार नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
कळंब आगारातील आगर प्रमुख तेथील बसचे नियोजन करणारे अधिकारी हे तेथे कामाला हजर राहतात मात्र तेथील कामकाजावर वारंवार अडचणी निर्माण होत असल्यामुळे त्यांच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
कळंब आगार हे जिल्ह्यात सर्वात जास्त उत्पन्न देणारे आगार म्हणून ओळखले जात आहे.गेल्या अनेक वर्षांपासून येथे योग्य मार्गदर्शन व योग्य नियोजन करणारे अधिकारी होते तेंव्हा नागरिकांना जास्त त्रास सहन करण्याची गरज नसायची.मात्र सध्याचे अधिकारी हे कसले आणि कुठल्या प्रमाणे प्रवाशांच्या हिताचे नियोजन करतात हे मात्र समजणे अवघड झाले आहे.आगार प्रमुख रजेवर असताना तेथील त्यांच्या जागेवर काम पाहणारे अधिकारी प्रवाशांच्या आडचणीकडे लक्ष देणं तर दूर मात्र फोन सुद्धा उचलत नाहीत.
ग्रामीण भागातून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांसाठी शासनाने वेगवेगळ्या योजना राबवून नागरिकांना कुठलाही त्रास होऊ नये याची काळजी घेत अनेक योजना राबवले आहेत मात्र गेल्या अनेक वर्षापासून कळंब आगारातील कर्मचारी हे बसचे नियोजन व्यवस्थित करत नसल्याने याचा फटका सामान्य प्रवाशांना सहन करावा लागत आहे धाराशिव येथील वरिष्ठ अधिकारी,लोक प्रतिनिधी देखील या गोष्टीकडे लक्ष देत नाहीत किंवा तेथील अधिकारी यांना जाब विचारत नसल्याने येथील अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार सुरू आहे. या बाबीकडे वरिष्ठ अधिकारी लोकप्रतिनिधी लक्ष देणारे नसतील तर कोण लक्ष देणार असा प्रश्न निर्माण होत आहे.
(उर्वरित भाग 2 मध्ये..नक्की वाचा)

Post a Comment
0 Comments