Type Here to Get Search Results !

कळंब आगारातील नियोजन व प्रवाशांचे हाल (भाग 2 )



कळंब न्युज (उपसंपादकीय) दत्ता शेटे

कळंब आगारातील दिनांक 21 रोजी पुन्हा व्यवस्थापक अधिकारी यांचे नियोजन नसल्याने अनेक फेऱ्या वरिष्ठ अधिकारी यांना न विचारता रद्द करण्यात आल्या असून

कळंब बार्शी जाणारी एकही बस बार्शीकडे 2 वा 30 नंतर कळंब आगारातून रवाना झालेली नाही.

तर काही येडशी ला जाणारी बस अर्ध्या रस्त्यातून माघारी आल्या आहेत. कळंब आगारामध्ये आगार प्रमुख नसल्याने त्यांच्या जागी काम पाहणारे व्यवस्थापकीय अधिकारी यांनी कुठल्या अधिकाऱ्यांना विचारून व सांगून गाड्यांच्या फेरा रद्द केल्या हे मात्र सांगण्यासाठी प्रशासन तयार दिसत नाही.

तसेच  कळंब आगारामधील अधिकारी हे फोन उचलत नाहीत त्यामुळे यासर्व बाबींचा जाब विचारायचा कुणाला असा प्रश्न प्रवाशी यांना निर्माण होतो.

कळंब आगारामध्ये सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे.संबंधित गुत्तेदार यांना  स्वच्छता करण्यासाठी सांगनारे अधिकारी नसल्याने बस स्थानकात सर्वत्र घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या घाणीच्या साम्राज्यामुळे नागरिकांना वेगवेगळ्या रोगांना सामोरे जावे लागत आहे. या सर्व गोष्टीकडे आगारप्रमुख तथा आगारातील इतर व्यवस्थापकीय अधिकारी लक्ष का देत नाहीत हा प्रश्न वारंवार निर्माण होत आहे. तसेच आगारातून बस स्थानकात वेळेवर बस येतात मात्र वेळेवर बस ज्या त्या मार्गाने वेळेआधी मार्गस्थ झालेले अनेक प्रकार घडलेले आहेत.त्याची पुष्टी जर करायची असेल तर वरिष्ठ अधिकारी यांनी तेथील सीसीटीव्ही चेक करुन कार्यवाही करु शकतात मात्र येथे अधिकारीच उपलब्ध नसल्याने जाब कोणाला विचारणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.

कळंब आगारांमधील सर्व बस ची अवस्था बिकट झाली असून धूर मारणाऱ्या गाड्यांमध्ये सुद्धा प्रवासी विलाज नसल्यामुळे प्रवास करत आहेत मात्र या गाड्या दुरुस्त करण्यासाठी जिल्हा प्रशासन किंवा तालुका प्रशासन तयार दिसत नाही.या सर्व गोष्टींचे अधिकाऱ्यांना काहीही गांभीर्य दिसत नाही ते आपले काम करतात आणि निघून जातात. कळंब आगारांमध्ये या सर्व गोष्टींना जबाबदार कोण असा प्रश्न निर्माण होत आहे.धाराशिव येथील वरिष्ठ अधिकारी हे देखील याकडे का दुर्लक्ष करतात हे देखील पाहणं तितकंच गरजेचे आहे.


उर्वरित भाग 3 मध्ये नक्की वाचा

Post a Comment

0 Comments