कळंब न्युज (उपसंपादकीय) दत्ता शेटे
गरज प्रवाशांना प्रशासनाला नाही असेच म्हणावे लागेल कारण कळंब आगारातील प्रश्न मांडण्यासाठी आगार प्रमुखच उपलब्ध नसतात त्यामुळे प्रवाशी म्हणतात आमदार कैलास दादा तुम्ही तरी थोडं लक्ष घालून आमच्या वेदना समजून घ्या.
ग्रामीण भागातील नागरिकांना शेतीच्या व इतर कामासाठी असणाऱ्या कळंब आगारातील अनेक बस खिळखिळ्या झाल्या आहेत. तरी सुध्दा या खिळखिळा बस रस्त्यावर धावत आहेत. कळंब आगाराला नवीन बस उपलब्ध करुण देण्यासाठी स्थानिक नेते व खासदार आमदार का? प्रयत्न करत नाहीत, आम्ही मोडक्या बस मध्ये किती दिवस प्रवास करायचा असा प्रश्न संतापजनक सवाल प्रवाशी यांच्याकडून वारंवार विचारला जात आहे.
सुरक्षिततेची हमी म्हणून मोफत प्रवासी विमा एसटी महामंडळामार्फत प्रवाशांना देण्यात येतो. मात्र, एसटीचा प्रवास हा प्रवाशांसाठी कितपत सुरक्षिततेची हमी देतात. हे पाहणे गरजेचे आहे.
राज्य परिवहन महामंडळाच्या अर्थात एसटीचे ब्रीद वाक्य प्रवाशांच्या सेवेसाठी असे आहे. परंतू एसटी महामंडळाच्या बसची तुटलेल्या खिडक्या, फाटक्या सीट व पावसाळ्याच्या दिवसात फाटलेल्या गळक्या छतामधून टपकणारे पावसाचे पाणी ही दुरवस्था पाहता प्रवाशांच्या सेवेसाठी ऐवजी प्रवाशांची कंबरडे मोडण्यासाठी, प्रवाशांची हाडे खिळखिळी करण्यासाठी असे म्हणण्याची वेळ प्रवाशांवर आली आहे.
खासगी बस सेवा तसेच राज्य परिवहन महामंडळाच्या बस मध्ये प्रवाशांसाठी विविध प्रकारच्या योजना एसटी महामंडळाच्या वतीने सुरू करण्यात आल्या आहेत. प्रवाशांसाठी लाभदायक असलेल्या योजना एसटी महामंडळाने राबवल्या, तरी प्रवासादरम्यान आवश्यक त्या सुविधा प्रवाशांना मिळत नाही. त्यामुळे महामंडळाला तोटा सहन करावा लागत आहे.
कळंब आगारात मागील काही वर्षापुर्वी ७० शेड्यूलमध्ये २०६ फेऱ्या होतात साधारण २६ हजार ५०० कि. मी पेक्षा कमी बस धावतात यातुन सहा लाख पेक्षा अधिक उत्पन्न मिळते. बस खिळखिळा झाल्यामुळे दिवसाचे सात हजार किमी चे अंतर कमी झाले आहे. त्यामुळे बस ही दिवसेंदिवस तोट्यात जात आहे.
एकुण ७८ बस धावतात यातील बहुतांश बस चे
फाटके पत्रे, खिळखिळी बॉडी, खिडक्या सुतळीने बांधलेल्या, पुढील मागील काच फुटलेले, स्टेरिंग ची दुरावस्था आहे. धडधाकट गाड्यांची वनवाच आहे.
अनेक लांब पल्ल्याच्या बस बंद करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे लालपरी मधून प्रवास करावा का नाही असा प्रश्न प्रवाशांना पडला आहे.
खिळखिळा बस झाल्यामुळे प्रत्येक दिवशी कुठे ना कुठे बस बंद पडण्याचे प्रकार वाढत चालले आहे. त्यामुळे दे धक्का मारण्याची वेळ येते. बसगाडय़ा रस्त्यावर धावत असल्याने प्रवाशांची हाडेही दररोज खिळखिळी होत आहेत.
प्रवाशी म्हणतात आमदार साहेबानी लक्ष देण्याची गरज असून आमदार कैलास घाडगे पाटील यांचे कळंब तालुक्यातील विविध प्रश्नांवर लक्ष असते मात्र आगारातील बस खिळखिळा झाल्या आहेत. नवीन बस येत नाहीत. प्रवाशी जिव मुठीत घेऊन प्रवास करत आहेत. त्यामुळे आमदार कैलास घाडगे पाटील यांनी याकडे लक्ष घालून आगारास नवीन बस उपलब्ध करुण देण्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

Post a Comment
0 Comments