Type Here to Get Search Results !

धाराशिव मतदार संघात भाजपचा उमेदवार देण्यासाठी सर्वे


 कळंब न्यूज ( उप संपादकीय )

सध्या जिल्ह्यात निवडणुकीचे वातावरण चांगलेच सुरु झाले आहे.कुठल्या पक्ष्याचा कोण उमेदवार असणार याची चर्चा मात्र सर्वत्र सुरु असून धाराशिव मतदार संघात मात्र भाजपा कडून एका सेवा निवृत्त अधिकाऱ्याला उमेदवारी देण्याबात भाजपा कडून चाचपणी सुरु आहे.

धाराशिव लोकसभा मतदार संघ हा गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेचा बल्ले किल्ला म्हणून ओळखला जातो मात्र याच शिवसेना पक्षात दोन गट झाल्याने हि जागा आता भाजप लढवू इच्छित असल्याचे समोर आले आहे. भाजप च्या वतीने एका खाजगी कंपनीच्या वतीने धाराशिव जिल्यातील नागरिकांना फोन करून एका लातूर येथील निवृत्त अधिकारी याना उमेदवारी देण्याबाबत चाचपणी सुरु केली आहे.या चाचपणी करून भाजप उमेदवार देण्याच्या तयारीत असल्याचे समोर येत आहे.

या  सर्व्हमुळे महायुतीचा उमेदवार लवकर समजला जाईल का नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे.

भाजप पक्षात वाढत चाललेले पक्ष प्रवेश इतर पक्षातील नेते मंडळी भाजप पक्षात प्रवेश करत असल्याने व शिंदे गटाचे कार्यकर्ते धनजंय सावंत यांचे भावी खासदार म्हणून बॅनर बाजी करत असल्याने धाराशिव मतदार संघातील जागा नेमकं कोण लढवणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे.


Post a Comment

0 Comments