Type Here to Get Search Results !

केम्ब्रिज च्या बालकलाकारांनी जिंकली प्रेक्षकांची मने....!


 
कळंब न्युज (प्रतिनिधी) 
शहरातील डिकसळ येथील केंब्रिज इंग्लिश स्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन अतिशय उत्साहात पार पडला असून यावेळी सुमारे 100 बालकलाकारांनी विविध गाण्यांचे वैविध्यपूर्ण प्रदर्शन करून प्रेक्षकांची मने जिंकली.
                  सदरील कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून ज्येष्ठ पत्रकार तथा मुद्द्याचे बोलू न्यूज चॅनलचे संपादक मुस्तान मिर्झा हे होते तर प्रमुखअतिथी म्हणून माऊली विद्यापीठाचे प्रशासक प्रताप मोरे, लोहटा येथील सरपंच संजय आडसूळ त्याचबरोबर ज्येष्ठ पत्रकार विशाल कुंभार, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते हनुमंत भोसले, प्राचार्य हनुमंत सौदागर यांची उपस्थिती होती. संस्थेचे अध्यक्ष राहुल सोनवणे तसेच उपाध्यक्ष रविकांत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सदरील कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. यावेळी शाळेतील सुमारे 100 बालकलाकारांनी हिंदी, मराठी त्याचबरोबर लोकगीते इत्यादी गीतांवर सादर करून प्रेक्षकांना मनमुराद आनंद दिला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष राहुल सोनवणे त्याचबरोबर उद्घाटक मुस्तान मिर्झा, प्रताप मोरे यांनी उपस्थित पालकांना विद्यार्थ्यांची जडणघडण कशी करावी आणि सांस्कृतिक कार्यक्रमाची व्यक्तिमत्व विकासामध्ये काय भूमिका आहे याची सविस्तर माहिती दिली.
                 सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्या मंदिरचे मुख्याध्यापक वैजनाथ चौधरी, केंब्रिजचे प्रिन्सिपल सुहास काळे तसेच केंब्रिज इंग्लिश स्कूल व डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यामंदिरच्या सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. तर कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन समन्वयक डी.डी. बनसोडे यांनी केले.

Post a Comment

0 Comments