कळंब ( प्रतिनिधी )
येथील शासकीय रुग्णालय हे सामान्य नागरिकांसाठी २४ तास उघडे असते मात्र कळंब येथील उपजिल्हा रुग्णालयात रुग्णाचा त्रास होऊ नये म्हणून चक्क दवाखान्याच्या मेन गेट ला कुलूप लावून डॉक्टर सह कर्मचारी झोपल्याचा प्रकार उघडकीस आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
कळंब येथील उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर व इतर कर्मचारी हे रात्रीच्या वेळेला गेटला कुलूप लावून झोपले होते.कळंब तालुक्यातील जवळ येथील एक रुग्ण प्रसूतीचा त्रास होत असल्याने दि . ०३ ऑगस्ट रोजी रात्रीच्या वेळेला कळंब येथील उपजिल्हा रुग्णालयात आले. उपजिल्हा रुग्णालयाच्या मेन गेटला कुलूप लावून अधिकारी वॉचमन सर्वजण गाड झोपलेले होते.प्रसुतीसाठी आलेल्या रुग्णाला त्रास होत होता. तेथील डॉक्टर व कर्मचारी १५ ते २० मी उठले व त्या रुग्णाला रेफर करा असे म्हणत होते. कळंब येथेच उपचार होत असताना त्या ठिकाणी प्रसूती न करण्याचा व आपली झोप मोड न होऊ देण्याचा या डॉक्टरचा मानसहोता मात्र समाज सेवाज संजीत मस्के यांच्यामुळे ग्रामीण भागातील या महिलेचे प्रसूती कळंब येथेच झाली.स्वतःचा आळशी पणा व झोप मोड होऊ नये म्हणूंन शासकीय कर्मचारी असे नेहमी घडत आहे.आरोग्य मंत्री यांच्याच जिल्ह्यात असे प्रकार घडत असल्याने प्रश्न चिन्ह निर्माण होत आहेत.
चौकट
सामाजिक सेवक संजीत मस्के यांनी ओरडाओरड करून तेथील डॉक्टर व कर्मचारी याना उठवले त्यानंतर सदरील डॉक्टर यांना विचारणा करताना रुग्णाला व्यवस्थित न बोलणे व व्यवस्थित रुग्ण सेवा न देणे यामुळे सामान्य रुग्णांना अशा डॉक्टर मुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या जिल्ह्यात असे प्रकार घडत असल्याने प्रशासनावर विविध प्रश्न उपस्थित होत आहेत.
चौकट
कळंब येथील उपजिल्हा रुग्णालयात चालू कामावर असलेले डॉक्टर हे गेट ला कुलूप लावून झोपल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला असून याकडे वैद्यकीय अधीक्षक यांनी कार्यवाही करण्याची मागणी रुग्णाच्या परिवाराकडून केली जात आहे. या प्रकरणाचे सर्व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
प्रतिक्रिया
कळंब तालुक्यातील जवळ येथील प्रसूती साठी आलेल्या महिलेला उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर व इतर कर्मचारी यांच्यामुळे जीव गमावण्याची वेळ आली होती.आरोग्य मंत्री तानाजी सावंत हे या जिल्ह्यातील असून त्यांनी या जिल्ह्यातील रुग्णायाकडे लक्ष देण्याची गरज आहे.संबंधित डॉक्टर व इतर कर्मचारी यांच्यावर कार्यवाही करण्यात यावी.
संजीत मस्के
समाज सेवक कळंब
प्रतिक्रिया
उपजिल्हा रुग्णालयातील सर्व प्रकारची माहिती घेऊन कामचुकार डॉक्टर व कर्मचारी यांची झालेल्या प्रकाराबाबत चौकशी करून योग्य कार्यवाही करण्यात येईल
डॉ नागनाथ धर्माधिकारी
जिल्हा शल्य चिकित्सक धाराशिव
Post a Comment
0 Comments