कळंब (प्रतिनिधी)
तालुक्यातील मोहा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संदीप मडके यांनी शेकडो सहकार्या सोबत शिवसेनेत प्रवेश केला असून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांना मोठा धक्का बसला आहे .
ढोकी येथील तेरणा सहकारी साखर कारखान्याच्या परिसरात शिवसेनेचा मेळावा पालकमंत्री तानाजी सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
या मेळाव्यात कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संदीप मडके यांनी शेकडो सहकार्या सोबत शिवसेनेत प्रवेश केला. त्यांचे स्वागत तानाजी सावंत यांनी केले.
याच बरोबर कळंब शहरातील शिवसेना (उबाठा) गटाचे सचीन सौलाखे, डॉ. गोविंद जोगदंड, बाबुराव शेंडगे, प्रशांत मोकाशे, संदीप पांचाळ, बनसोडे सर, सचीन रघुनाथ चोंदे, अनील शिंपले, शुभम जोशी, हरीभाऊ शिंपले, सुनील लांडगे, शिवाजी शिंपले, अमेय राजमाने, बंडू चोंदे, विजय काळदाते, गोविंद शिंदे, सचीन सालपे, संभाजी हारकर, खंडू हारकर या सर्वांचा तानाजी सावंत यांच्या हस्ते व धनंजय सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवेश झाला.
यावेळी नितीन लांडगे, संजय मुंदडा, सुधीर भवर, मंदार मुळीक, शंकर वाघमारे, सागर मुंडे, संघर्ष कांबळे, शकील काझी, प्रमोद करवलकर, धम्मा विद्यागर इम्रान सय्यद, मोबीन बागवान, उत्रेश्वर चोंदे, नियामत पठाण, आकमल काझी आदी उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments