कळंब न्यूज ( प्रतिनिधी )
धाराशिव कळंब मतदार संघात महायतीकडून उमेदवार घोषित करण्यात येणार आहे.गेल्या अनेक दिवसापासून या मतदार संघात महायुती कोणाला उमेदवारी देणार याकडे लक्ष लागले होते मात्र आता हा तिढा संपल्याचे सांगण्यात येत असून भाजपचे तालुकाध्यक्ष अजित पिंगळे यांना शिवसेना
( शिंदे गट ) कडून उमेदवारी देण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून कळंब तालुक्यातून उमेदवारी मिळत नव्हती.यावेळी कळंबकरानी स्थानिकचा आमदार करण्याचा निर्धार केला.यातच आता अजित पिंगळे यांना उमेदवारी जाहीर होत असल्याचे समजत असून यावेळी कळंबच्या उमेदवाराला संधी मिळेल अशी अपेक्षा आहे.
धाराशिव कळंब मतदार संघातून अद्याप अधिकृत घोषणा झालेली नसून या मतदार संघातील उमेदवाराची घोषणा आज होईल असे विश्वसनीय सूत्रांकडून कळत आहे.

Post a Comment
0 Comments