कळंब
छोटी शिवकाशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तेरखेडा मध्ये फटाक्यांसाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली असून या तेरखेडा गावात फटाका कारखाण्यामुळे हजारो हातांना रोजगार मिळत आहे. तर महाराष्ट्रात फटाक्यांसाठी या गावाची मोठी ओळख आहे.
धाराशिव जिल्ह्यातील तेरखेडा हे गाव वाशी तालुक्यात येते. येथे युवकांनी मोठ्या प्रमाणात फटाका कारखाने सुरु केले आहेत.या गावांमध्ये छोट्या मोठ्या विविध आणि आकर्षक फटाके होलसेल भावात मिळतात.या गावांमध्ये फटाके खरेदी करण्यासाठी महाराष्ट्र आणि इतर राज्यातून नागरिक आवडीने येतात.
दिवाळी म्हटलं की फटाके आलेच, पण आता आरोग्यासाठी आणि पर्यावरणासाठी हानिकारक असलेल्या पारंपरिक फटाक्यांना बाजूला सारून ‘ग्रीन फटाक्यां'ची एक नवी लाट आली आहे. या बदलाच्या केंद्रस्थानी उभं आहे महाराष्ट्राचं एक छोटंसं गाव – धाराशिव जिल्ह्यातील तेरखेडा. हे गाव आज 'महाराष्ट्राचं शिवकाशी' म्हणून ओळखले जाते, कारण येथे दरवर्षी तब्बल 30 ते 40 कोटी रुपये किंमतीचे फटाके तयार होतात आणि आता इथेही पर्यावरणपूरक ग्रीन फटाक्यांच्या उत्पादनाने जोर धरला आहे.
ग्रीन फटाके म्हणजे काय? ग्रीन फटाके म्हणजे असे पर्यावरणपूरक फटाके जे पारंपरिक फटाक्यांच्या तुलनेत कमी प्रदूषण करतात. वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (CSIR) च्या राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था (NEERI) यांनी हे फटाके विकसित केले आहेत. सण-उत्सवांच्या काळात, विशेषतः दिवाळीत होणारे वायू प्रदूषण कमी करणे हा या मागचा मुख्य उद्देश आहे. पारंपरिक फटाक्यांमध्ये बेरियम नायट्रेट, आर्सेनिक, लीड यांसारखे घातक विषारी घटक वापरले जातात, ज्यामुळे आरोग्यावर वाईट परिणाम होतो. याउलट, ग्रीन फटाक्यांमध्ये पोटॅशियम नायट्रेट किंवा इतर कमी हानिकारक ऑक्सिडायझरचा वापर केला जातो.
ग्रीन फटाक्यांमुळे कमी प्रदूषण
ग्रीन फटाके म्हणजे असे पर्यावरणपूरक फटाके जे पारंपरिक फटाक्यांच्या तुलनेत कमी प्रदूषण करतात. वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (CSIR) च्या राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था (NEERI) यांनी हे फटाके विकसित केले आहेत. सण-उत्सवांच्या काळात, विशेषतः दिवाळीत होणारे वायू प्रदूषण कमी करणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. पारंपरिक फटाक्यांमध्ये बेरियम नायट्रेट, आर्सेनिक, लीड यांसारखे घातक विषारी घटक वापरले जातात, ज्यामुळे आरोग्यावर वाईट परिणाम होतो. याउलट, ग्रीन फटाक्यांमध्ये पोटॅशियम नायट्रेट किंवा इतर कमी हानिकारक ऑक्सिडायझरचा वापर केला जातो, ज्यामुळे पार्टिक्युलेट मॅटर (PM) उत्सर्जनात 30 ते 40 टक्क्यांपर्यंत घट होते.
Post a Comment
0 Comments