Type Here to Get Search Results !

अबब....कळंब नगर पालिकेकडे आता पर्यंत....एवढ्या हरकती दाखल... अधिकृत आकडेवारी सोडून....

 

कळंब

येथील नगर परिषद मधील प्रारुप मतदार यादीमध्ये मोठा गोंधळ झाला होता.त्यानंतर हरकती मागवण्यात आलेल्या असून त्याचा आज शेवट दिवस असताना तब्बल १० प्रभागातील २६०० मतदारानी हरकती नोंदवण्यात आलेल्या आहेत.त्याची १३ ऑक्टोबर ही शेवट तारीख होती मात्र अनेक जणांच्या तक्रारी आल्यानंतर हरकती मागवण्याची तारीख वाढवण्यात १७ ऑक्टोबर करण्यात आलेली होती.कळंब न प मतदार यादीमध्ये ग्रामीण भागातील नागरिकांचे नावे आलेली असल्याने ते नावे कमी होणार का नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे.कळंब मधील १० प्रभागात २१ हजार मतदार आहेत.या प्रभागात ५०० ते ६०० मतदारांची हेराफेरी झाली आहे.जो मतदार ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी त्या मतदाराचे नाव नसल्याने त्यांचे मतदान राहत्या ठिकाणी लावण्यासाठी नेतेमंडळीसह कार्यकर्ते धावपळ सुरु असल्याचे दिसून येत आहे.आता पर्यंत न प मध्ये २६०० जणांनी हरकती दाखल केल्या असून पूर्णतः आकडेवारी अजूनपर्यंत समोर आलेली नाही.

Post a Comment

0 Comments