मराठा आरक्षणासाठी गोजवाडा ते येडेश्वरी मंदिरापर्यंत महिलांनी काढली दंडवत यात्रा
कळंब ( प्रतिनिधी )
वाशी तालुक्यातील गोजवाडा या गावातील मराठा बांधव व महिला यांनी गोजवाडा ते येडेश्वरी देवीच्या गाभाऱ्या पर्यंत आरक्षण मिळण्यासाठी दंडवत घेत गेले आहेत.
गोजवाडा येथील युवक महिला यांनी मराठा समाजाला तात्काळ आरक्षण मिळावे तसेच . मनोज जरांगे पाटील दीर्घायुष्य लाभावे म्हणून येडेश्वरीच्या चरणी साकडे घालण्यासाठी गोजवाडा गावातून येडेश्वरीच्या मंदिरापर्यंत मराठा आरक्षण दंडवत यात्रा काढली आहे. दुपारच्या रखरखत्या ऊनात शरीर भाजून निघेल एवढ्या तापलेल्या रस्त्यावर दंडवत घालत गेले आहेत.
Post a Comment
0 Comments