राज्य शासनाने महाराष्ट्रातील सर्व सरकारी शाळा कंत्राटी नोकर भरती खाजगीकरणाचा जो निर्णय राज्य सरकारने घेतला आहे तो तात्काळ रद्द करण्यात यावा. अशी मागणी लहुजी शक्ती सेना कळंब तालुक्याच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांच्या द्वारे मुख्यमंत्री यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.सदरील निवेदन गुरुवार दि.०५ रोजी देण्यात आले आहे.
राज्यातील सर्व सरकारी शाळांच्या कांत्राटी करणाचा तसेच सरकारी नोकर भरती खाजगी संस्थांच्या माध्यमातून करण्याचा तुघलकी निर्णय तात्काळ रद्द करण्यात यावा अशी मागणी लहुजी शक्ती सेना कळंब यांच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
राज्य शासनाने महाराष्ट्रातील जिल्हा परिषद शाळा व सरकारी शाळांचे खाजगीकरण करण्याचा निर्णय पारीत केला आहे तसेच शासकीय नोकर भरती कांत्राटी पद्धतीने करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे शासनाने तात्काळ वरील सर्व जीआर रद्द करावेत अन्यथा लहुजी शक्ती सेनेच्या वतीने राज्यभर आंदोलने करण्यात येतील असा इशारा या निवेदनातून देण्यात आला आहे. या निवेदनावर कळंब तालुका अध्यक्ष पांडुरंग तात्या कदम, प्रसिद्धी प्रमुख विकास दादाराव गायकवाड, जिल्हा संघटक बालाजी भाऊ उपरे, मातंग समाजाचे नेते श्रावण ताटे, दीपक बाबा कसबे, महादेव शेंडगे, राहुल ताटे, मयूर शिंदे, आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Post a Comment
0 Comments