कळंब न्यूज (प्रतिनिधी )
शासनाने 75 वर्षावरील जेष्ठ नागरिकांना मोफत प्रवास सुरु केला असून याच बरोबर सर्व महिलांना देखील अर्धे तिकिट म्हणजे हाफ तिकीट सुरु केले आहे.ज्या जेष्ठ नागरिकांचे वय 75 वर्ष होत नाही अशा नागरिकांनी बनावट( डुप्लिकेट) आधार कार्ड बनवून मोफत प्रवास करण्याचा रस्ता अवलंबून मोफत प्रवास करत आहेत.ज्या जेष्ठ नागरिकांचे वय 75 वर्ष भरत नाही असे जेष्ठ नागरिक आधार कार्ड वर खोटी जन्म तारीख तयार करुन प्रवास करत आहेत मात्र आता एस टी महामंडळाचे वाहक देखील तितकेच सतर्क झाले असून आधार कार्ड खरे आहे का खोटे याची तात्काळ पडताळणी करुन प्रवाश्याना फुल तिकीट काढून प्रवास करण्यासाठी भाग पाडत आहेत.महाराष्ट्र शासनांनी राज्यातील जे जेष्ठ नागरिक 75 वर्षांपुढील असतील त्यांना मोफत प्रवासाची घोषणा केली होती.
बनावट( डुप्लिकेट) आधार कार्ड बनवून मोफत प्रवास करणाऱ्यांना चांगलाच चाप मिळाला असून असे वाहक जर प्रत्येक आगारात असतील तर बनावट( डुप्लिकेट) आधार कार्ड दाखवून मोफत प्रवास करणाऱ्या जेष्ठ नागरिक असे कृत्य करु शकणार नाहीत.

Post a Comment
0 Comments