Type Here to Get Search Results !

धूर मारणाऱ्या खराब बस असताना देखील पहिल्यांदाच झाला कळंब आगाराला एवढा फायदा.....


कळंब न्यूज  ( प्रतिनिधी )

अधिकारी चांगले  काम करत असताना वरीष्ठ अधिकारी यांनी देखील त्यांना चांगल्या प्रकारे साथ द्यायला हवी मात्र कळंब आगाराच्या बाबतीत वरिष्ठ अधिकारी मूग गिळून गप्प बसत असल्याचा फटका प्रवाश्याना बसत आहे.

कळंब आगार हे उत्पन्नाच्या द्रुष्टीने धाराशिव जिल्ह्यात चांगल्या प्रकारे उत्त्पन्न देते मात्र वरिष्ठ अधिकारी हे कळंब आगारासाठी नवीन बस देत नसून जुन्या बस दुरुस्त करण्यासाठी तात्काळ मदत देखील करत नसल्याने कळंब आगारातील बस धूर मारत प्रदूषण करत फेऱ्या मारत आहेत.

कळंब आगारातील आगार प्रमुख चालक,वाहक व कर्मचारी यांच्या नियोजनाने  कळंब आगाराला दिवाळीमध्ये या अगोदर कधीच इतका फायदा झाला नाही त्याच्या दुप्पट फायदा या दिवाळी मध्ये कळंब आगाराला झाला आहे.

कळंब येथील आगारात एकूण ७८ बस आहेत.यामधील चार बस या लांब पल्ल्याच्या आहेत.तर ७४ बस पैकी ६ बस  धूर सोडत वातावरण दूषित  करत आहेत.या ६ बसचा डिझेल सप्लायरचा (FYB ) प्रॉब्लेम  असून धाराशिव येथील यंत्र अभियंता हे वेळेवर बस दुरुस्तीचे साहित्य (FYB ) देत नसल्याने या ६ बस धूर मारत फेऱ्या करत आहे.तर ६८ बस  आगारामध्ये बऱ्यापैकी आहेत.धाराशिव जिल्ह्यात इतर तालुक्यातील आगारात नवीन बस दिल्या आहेत मात्र यंत्र अभियंता यांनी कळंब आगारासाठी एक हि नवीन बस दिली नाही.या यंत्र अभियंता याना आगारप्रमुख यांनी वारंवार लेखी मागणी करून देखील याकडे लक्ष दिले नाही.वरिष्ठ अधिकारी जर आगाराला सहकार्य करणार नसतील तर आगारात प्रमुखांनी आगारातील बस कशा प्रकारे चालवायच्या हा मोठा प्रश्न निर्माण होत आहे.  

दिवाळीच्या १५ दिवस अगोदर कळंब आगाराचे उत्पन्न ५ लाख २५ हजार एवढे होते आणि सवलती मधील प्रवास करणारे यांचे उत्पन्न ५ लाख २१ हजार एवढे आहे तर दिवाळीमध्ये  ८ ते १० लाख रुपयांचे उत्पन्न कळंब आगाराने कमवले  असून यामध्ये सवलतीमध्ये प्रवास करणाऱ्या ७ तर ८ लाख रुपये उत्पन्न मिळाले असून या अगोदर या आगारामध्ये एवढे उत्पन्न कधीही निघाले नव्हते.

कळंब आगाराचे उत्पन्न चांगले आहे पण बस ची दुरुस्ती आणि नवीन बस ची मागणी केल्यावर वरिष्ठ अधिकारी का लक्ष देत नाहीत असा प्रश्न  निर्माण होत आहे. 

प्रतिक्रिया 

कळंब आगारातील कांही बस चांगल्या नसल्याने आगारातील उत्पन्न वाढीसाठी अडचण निर्माण होत आहे.वारंवार वरिष्ठाना लेखी मागणी करणे चालूच आहे.वरिष्ठांनी मागणी तात्काळ पूर्ण केल्यास कळंब आगारातील उत्पन्न वाढू शकते ज्या बस खराब आहेत त्यांची तात्काळ दुरुस्तीचे काम चालू आहे.या दिवाळीमध्ये उत्पन्न वाढीसाठी चालक,वाहक,व सर्व कर्मचारी यांच्या सहकार्यामुळे उत्पन्न वाढले आहे.

करवंदे पी एम 

(आगार प्रमुख कळंब )


Post a Comment

0 Comments