धाराशिव (प्रतिनिधी)
धाराशिव शहरात समता नगर येथील दत्त मंदिर येथे श्री दत्त जयंती निमित्त रांगोळी साकारण्यात आली आहे.
या रांगोळीचा आकार 120 चौरस फूट इतका भव्य असून आहे.या रांगोळीसाठी 70 किलो रंगीत रांगोळीचा वापर करण्यात आला आहे, ही रांगोळी तब्बल पाच तासांच्या कालावधीत कलायोगी आर्ट्स चे संचालक राजकुमार कुंभार, व ऋतिका कुंभार, यांच्या मार्गदर्शनात रिद्धीमा ढेकणे, जय पंडित, प्रज्ञेश व्यास, कार्तिक काकडे या विद्यार्थ्यांनी साकारली आहे.
ही रांगोळी, दिनांक 25 डिसेंबर, ते 27 डिसेंबर पर्यंत भाविक भक्तांना पाहण्यास खुली करण्यात आली आहे.

Post a Comment
0 Comments