Type Here to Get Search Results !

कळंब आगारातील नियोजन व प्रवाशांचे हाल (भाग 4 )



कळंब न्यूज (उपसंपादकीय )दत्ता शेटे (भाग 4)

कळंब  बस स्थानकातील आगार प्रमुख,वाहतूक नियंत्रक यांच्या नियोजना अभावी खाजगी गाड्यांचे पार्किंग  बस स्थानक बनले असून याकडे वाहतूक नियंत्रक यांचे दुर्लक्ष होत असल्याचे पुन्हा एकदा उघडकीस आले आहे.

कळंब बस्थानकात महिला ,जेष्ठ नागरिक,विद्यार्थी यांच्यासह अनेक जण बसस्थानकात प्रवास करण्यासाठी येतात.यामध्ये   पार्किंग केलेल्या खाजगी गाड्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

एसटी महामंडळाच्या आगार प्रमुख, वाहतूक नियंत्रक यांच्या दुर्लक्षामुळे बसस्थानक खाजगी वाहनतळ बनले आहे. कुणी ही या खाजगी वाहन पार्किंग करा, अशी अवस्था बनली आहे. याठिकाणी दुचाकी, चारचाकी सर्रास उभी केली जातात. त्यामुळे बाहेरुन आगारात येणाऱ्या बसेसला मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत आहे. आगारातील पार्किंगकडे आगार प्रमुख व वाहतूक नियंत्रक उघड्या डोळ्यांनी बघतात. शहरात वाहन लावण्यासाठी जागाच नाही. परिणामी बसस्थानक आवारात पार्किंग होत आहे. अर्थात, आता बसस्थानकाचे आवार दुचाकी व चारचाकी वाहनांचे वाहनतळच बनले आहे.

बसस्थानकातील बेशिस्त पार्किंगचा प्रश्न आजही कायम आहे. बसस्थानकाच्या आवारात खासगी वाहने उभी करू नये, अशा सूचना दिल्या जातात. परंतु त्या अमलात येत नाही. काही वाहनचालक बसस्थानकाच्या आवारात वाहने उभीकरतात. त्यामुळे येथील वाहतूक विस्कळित होत आहे. अगदी प्रवेशद्वारापासून ते बस लावण्याच्या जागेपर्यंत पार्किंग जाऊन पोहचली आहे.यामुळे बस लावण्यासही अडचणीचे होत आहे.याकडे सुद्धा कळंब आगराचे दुर्लक्ष असून या आगारामध्ये काम करणारे अधिकारी कशाची पगार घेतात असा संतप्त सवाल प्रवाशी वर्ग करत आहे.

Post a Comment

0 Comments