Type Here to Get Search Results !

जि. प. प्रा. शाळांची अंतरशालेय क्रीडा स्पर्धाची तयारी जोरात : स्वाती मोराळे


  कळंब न्युज (प्रतिनिधी)

तालुक्यातील जि. प. प्राथमिक शाळेतीलअंतर शालेय क्रीडा स्पर्धाचे आयोजन इटकूर येथे करण्यात आले आहे. यामध्ये कबड्डी, खो खो, लांब उडी, उंच उडी, गोळा फेक, थाळी फेक,धावणे आशा स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे.

       या दरम्यान जि. प. प्रा. शाळा आढाळा ता. कळंब जि. धाराशिव येथे स्वाती मोराळे यांनी भेट दिली असून  मुलं व मुली कबड्डीची पूर्व तयारी  करत होते.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आढाळा ता. कळंब येथे  शाळेला सदिच्छा भेट देऊन विद्यार्थ्यांशी हितगुज साधले, मार्गदर्शन केले, तसेच त्यांचेसोबत काही वेळ रममाण होऊन खेळात सहभागही घेतला,यावेळी शिक्षणप्रेमी नागरिक जयचंद वायसे , भोसले मॅडम, मुख्याध्यापक ऋषिकुमार साबळे, सहशिक्षक महादेव खराटे, सुजिता भोसले, बलभीम राऊत, बन्सी मोराळे हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होते. गावकऱ्यांच्या व सरपंच यांनी शाळेला मैदान करुन दिले. त्यामुले विद्यार्थी व शिक्षक उत्साही दिसत होते. आम्ही प्रत्येक सामन्यात विजयी होण्यासाठी प्रयत्न करू असा आत्मविश्वास विद्यार्थी, शिक्षक व मुख्याध्यापक यांनी दिला. खेळामुळे मुलामध्ये अभ्यासात ही उत्साह दिसत आहे अशी माहिती महादेव खराटे यांनी दिली.

Post a Comment

0 Comments