Type Here to Get Search Results !

सवकारकीच्या जाचास कंटाळून आत्महत्या करणाऱ्या सावकारा विरोधात गुन्हा दाखल


कळंब न्युज (प्रतिनिधी )

तालुक्यातील पिंपळगाव (डो) येथील शेतकरी आण्णासाहेब केरबा काळे यांनी 18 डिसेंबर  रोजी 06 वाजून 18 मि डिकसळ ते पिंपळगाव रोडवर फॉरेस्टच्या गायरानजवळ विठ्ठल रघुनाथ बारगुले यांच्या शेताच्या  कडेला असणाऱ्या लिंबाचे झाडाला गळफास घेवून आत्महत्या केली होती.ही आत्महत्या सावकाराच्या जाचाला कंटाळून केली असल्याने त्यांच्या कुटुंबियांनी फिर्याद दिल्यानंतर सावकारावर गुन्हा दाखल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

कळंब शहरात सध्या सावकाराचा मोठा सुळसुळाट सुरु आहे.अवाच्या सव्वा भावाने लोक सावकाराकडून व्याजाने पैसे घेत आहेत मात्र याचा फटका व जीव गमावण्याची वेळ वेळेवर पैसे उपलब्ध न होणाऱ्या लोकांवर येत आहे.प्रशासनाने आशा सावकारा वर मोठे निर्बंध आणण्याची गरज आहे.कळंब शहरा लगत असणाऱ्या डिकसळ मधील खाजगी सावकार गोविंद बाबुराव शिंदे  याचे कडून आण्णासाहेब काळे यांनी व्याजाने घेतलेल्या पैशाचे व्याज  देण्याचे कारणावरुन शेतकरी आण्णासाहेब काळे यांना आरोप गोविंद शिंदे व्याजाचे पैशावरुन सतत मानसिक त्रास देवून व्याजाचे पैशावरुन मयताची पत्नी व मुलगी यांना घेवून जाईन अशी शिवीगाळ करुन धमकी दिल्यावरुन त्यांचे जाचास व त्रासास कंटाळून नैराश्यातुन आण्णासाहेब काळे यांनी आत्महत्या केली आहे. 

 आकाश आण्णासाहेब काळे यांच्या फिर्यादीवरून  भा.दं.वि. कलम- 306, 504, 506 अन्वये कळंब पोलिस ठाणे येथे  गुन्हा नोंदवला असून या आरोपीस पोलीस कधी अटक करतात हे देखील पाहणे तितके गरजेचे आहे.

Post a Comment

0 Comments