कळंब न्यूज (प्रतिनिधी)
महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांना दोन लाखाच्या लिडणे निवडून आणण्याचा निर्धार जिल्ह्याचे पालकमंत्री तानाजी सावंत यांनी ढोकी येथील मेळाव्यात केले आहे.
लोकसभेची जागा शिवसेना (शिंदे गट) ला मिळाली नसल्याने नाराज असल्याची चर्चा सतत उफाळत होती मात्र आता या चर्चेला पूर्णविराम लागला आहे.
पुढे बोलताना सावंत म्हणाले की, खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार कैलास पाटील यांच्यावर असक्षम नेते आहेत. ओमराजे निंबाळकर हे माझ्या कार्यकर्त्यांना फोन करून संभ्रम निर्माण करत आहेत. कारखान्याचे भंगार विकून खाणारा माणूस व कोरोनाच्या काळात पालकमंत्री शंकराव गडाख यांच्या पाठीशी लपून जिल्ह्यात भ्रष्टाचार करण्याचा धुमाकूळ घालणारा खासदार आहे . मी पैसे खाऊ नको म्हणून खासदार ओमराजे यांना सांगितलं तर ओमराजे निंबाळकर म्हणाले की सत्ता आहे तोपर्यंत पैसे नाही खायचे तर काय .....ण खायचं का असं म्हणणारे बेइमान माणसाला पुन्हा निवडून द्यायचं नाही.
अर्चना पाटील यांना निवडून आणण्यासाठी वर्धा येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व नागपूर येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अर्चना पाटील यांना निवडून आणून देण्याचा शब्द दिला असल्याचे या मेळाव्यात बोलताना पालकमंत्री तानाजी सावंत यांनी कार्यकर्त्यांना सांगितले आहे. तसेच कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लावून महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांना दोन लाखापेक्षा जास्त मताधिक्याने निवडून आणण्याचा निर्धार केला आहे.
या बैठकीसाठी शिवसेनेचे ( शिंदे गट ) जिल्ह्यातील सर्व नेते कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments