कळंब न्यूज प्रतिनिधी
तालुक्यात ऑगस्ट महीन्यापासून झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे तर अतोनात नुकसान झालेच परंतु काही गावांमध्ये घरात पाणी शिरून अन्नधान्यासह संसारोपयोगी साहित्याचेही नुकसान झाले.
गेल्या पंधरा दिवसांपुर्वी जाफराबादकरांनी सामाजिक कार्यकर्ते प्रभू गाढे, ग्रामसेवक लोखंडे, प्रा वायाळ, विठ्ठल नाखोड यांच्या सोबत 45 क्विंटल धान्य व संसारोपयोगी साहित्य पाठवून मदत केली होती. त्यानंतर ही पाऊस झाला आणि परत नुकसान झाले यावेळी विठ्ठल माने व पत्रकार परमेश्वर पालकर यांनी भोकरदन येथील लोकजागर सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष केशव पाटील जंजाळ यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आणखी मदत देण्याचे आश्वासन दिले. त्यांनी मंगळवारी सकाळी आठशे किट घेऊन कळंब तालुक्यात हजर झाले. यामध्ये गहू, तांदूळ, डाळी, तेल, रवा, साखर, ताट, तांब्या, साडी, ब्लॅन्केट आदी वस्तूंचा समावेश होता. हे किट एकूरगा, जवळा, पिंपळगाव (को), भोगजी, आडसूळवाडी, ईटकूर, गंभीरवाडी, बोरगाव (ध) आदी गावात नुकसानग्रस्ताना वाटण्यात आले. यावेळी लोकजागर संस्थेचे अध्यक्ष केशव पाटील जंजाळ, जाफराबादचे सामाजिक कार्यकर्ते प्रभू गाढे, गजानन फड, सचिन तेलंगरे, आदित्य सोनी, गौरव कुदर, साहेबराव गावंडे, भागवत कानडजे, नारायण जाधव, रामदास गाढे, राजू भवर, फकीरबा उबाळे, अशोक इचचे, दगडूबा सुसर, हसन चाऊस, चाऊस अली, भगवान महाराज इचचे हे शेतकरी बांधव सुद्धा उपस्थित होते. हे किट गरजू पर्यंत पोहच करण्यासाठी राष्ट्रवादी उद्योग आघाडीचे(शरद पवार) जिल्हाध्यक्ष विठ्ठल माने,अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे मराठवाडा अध्यक्ष परमेश्वर पालकर, अभयसिंह आडसुळ, शिवाजी पाटील, धनंजय घोगरे, रामेश्वर जाधवर, रोहित आडसुळ आदीनी सहकार्य केले.

Post a Comment
0 Comments