Type Here to Get Search Results !

कळंब येथे स्वयं सहाय्यता समूहातील महिलांनी उत्पादित केलेले कलाकुसर व सुकामेवा विक्री व प्रदर्शन.


 



कळंब न्युज प्रतिनिधी

  उमेद  महाराष्ट्र राज्य ग्रामीण व जीवनोन्नती अभियान तालुका  व्यवस्थापन कक्ष पंचायत समिती कळंब यांच्या वतीने  दीपावली महोत्सव  दिनांक १५ ऑक्टोबर ते १७ ऑक्टोबर  या कालावधीत आयोजित केला आहे.

 यामध्ये कळंब तालुक्यातील स्वयंसहाय्यता समूहातील महिलांनी उत्पादित केलेले  उत्पादने कलाकुसर व सुका मेवा विक्री व प्रदर्शन  कळंब शहरातील मुख्य बाजारपेठ शिवाजी महाराज चौक कळंब येथे आयोजित करण्यात आले आहे.महोत्सवाचे उद्घाटन तहसीलचे  नायब तहसीलदार (महसूल) गोकुळ भराडीया यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले.याप्रसंगी उपस्थितांना नायब तहसीलदार गोकुळ भराडीया यांनी मार्गदर्शनपर बोलताना सांगितले की, महिलांनी उत्पादन केलेली उत्पादने अत्यंत चांगली असून या कामात तहसील कार्यालयाची बचत गटांना व महिलांना मदत केली जाईल तसेच महिलांना दिल्या जाणाऱ्या सर्व योजनासाठी जास्तीत जास्त माहिती देऊन अर्ज करावेत यासाठी देखील तहसील कार्यालय आपल्याला मदत करेल असे सांगून शेवटी महिलांना महोत्सवा निमित्त शुभेच्छा दिल्या. यावेळी तालुका अभियान व्यवस्थापक अलंकार बनसोडे यांनी कळंब शहरातील शासकीय कार्यालयातील सर्व अधिकारी कर्मचारी तसेच तालुका व शहरातील नागरिक यांनी जास्तीत जास्त संख्येने महोत्सवास भेट देऊन खरेदी करावी असे आवाहन केले. यावेळी तालुका व्यवस्थापक अभिजीत पडवळ, तालुका व्यवस्थापक पवन पवार,प्रभाग समन्वयक अमोल सालपे,सूर्यकांत खेडकर,खंडू बर्डे,मकरंद कुलकर्णी,अनिता बेडके,विनोद घोळवे, पांडुरंग भुजबळ, CLF मॅनेजर सपना सुरवसे,CRP,उपजिविक सखी व गटातील उत्पादक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments